Lohagad murder case – केतन अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर, नातवाच्या आठवणीत व्याकूळ आजोबांचे निधन
लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून देण्यात आलेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. नातवाच्या अकाली निधनाचा धक्का सहन न झाल्याने केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचेही एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या दुहेरी धक्क्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाचे वृत्त दिले.
Comments are closed.