मुंबईत एसी लोकलमध्ये पावसाची सर, प्रवाशांची तारांबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे शहरातील पायाभूत सुविधांची पुन्हा एकदा परीक्षा सुरू असतानाच एसी लोकलमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसी लोकलच्या डब्याच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना डब्याच्या आतच छत्र्या उघडाव्या लागल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवरील ‘ट्विशा’ या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “मुंबई लोकलमध्ये आता पाहण्यासारखे काहीच उरले नाही, असे वाटत असतानाच…” अशा आशयाच्या कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एसी लोकलच्या छतामधून पाणी गळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

व्हिडीओमध्ये डब्याच्या छतावरून सतत पाणी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे काही महिला प्रवाशांनी अंग भिजू नये म्हणून डब्याच्या आतच छत्र्या उघडल्या, तर काहींनी रेनकोट परिधान करून प्रवास केला. एसी लोकलमध्ये अशा प्रकारे पाणी गळत असल्याचे दृश्य पाहून अनेक प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Comments are closed.