महादेव मुंडे प्रकरणात वेगवान घडामोडी, एसआयटी प्रमुख पंकज कुमावत यांनी केली घटनास्थळाची पाहणी

महादेव मुंडे खून प्रकरण बीड : महादेव मुंडे खून प्रकरणाचा (Mahadev Munde Murder Case) तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एस.आय.टी.चे (SIT) प्रमुख पंकज कुमावत सोमवारी परळी येथे दाखल झाले. त्यांनी तहसील समोरील मैदानात असलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत एस.आय.टी. मधील सदस्य आणि परळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान घटनास्थळी पोहचलेले पथक रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळीच होते. यावेळी कुमावत यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला, आता यानंतर तपासाला सुरुवात होणार आहे. महादेव मुंडे यांचे मारेकरी 21 महिन्यापासून मोकाटच आहेत.

तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर महादेव मुंडे यांच्या खुनाचे देखील आरोप होऊ लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा आरोपी देश सोडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आत्तापर्यंत नेमकं काय काय झालं?

भर पावसात केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सरकार खडबडून जागे झाल्यानंतर. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटीसाठी बोलावले गेले. महादेव मुंडे यांच्या मृतदेहाचे फोटो दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे देखील डोळे पानावल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमाला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुंडे प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत आणि संतोष साबळे यांच्या एसआयटीची तात्काळ घोषणा केली. त्यातच वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड असणारा ज्ञानोबा उर्फ गोठ्या गीत्तेचा आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ परळी जवळील मालेवाडी रेल्वे पटरीवरचा होता.

यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील गोट्या गीतेच्या गुन्ह्याची माहिती एक्स पोस्ट करत दिली. माहितीसामाजिक कार्यकर्ते असलेल्या बाळा बांगर यांनी माध्यमांसमोर येत गोठ्या गित्ते आणि तांदळे नामक युवकांनी मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली असल्याचा खळबळजनक आरोप केला. आणि या आरोपामुळे एकच खळबळ उडाली.

महादेव मुंडे प्रकरणात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी रात्री एक्स वर पोस्ट करत महादेव मुंडे यांचे मारेकरी प्रदेशात पळून जाणार असल्याचे सांगितले.. इतकच नाही तर तर हे वाल्मीक कराडचे नातेवाईक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.. सरकारने कुमावत यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या एसआयटीने देखील याची दखल घ्यावी असे म्हणत मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची हीच वेळ असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

परिणामी21 महिन्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे कुटुंबियांनी लढा उभाभरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली, एसआयटीची स्थापना देखील केली. मात्र, एसआयटी स्थापन करूनही जर आरोपी भारताबाहेर फरार होत असल्याचे रोहित पवार यांचा दावा खरा असेल तर पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून आवर कारवाई करायला पाहिजे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.