मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळानंतर सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा निर्णय


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून आता जिल्हा परिषद आणि महापालिका (Mahapalika) निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. त्यासाठी, राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वी प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्यांमध्ये अद्यापही घोळ आणि दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याने आता नव्याने मतदार प्रारुप याद्या तयार करण्यात येणार आहेत. कारण, एकट्या मुंबईतच 11 लाख दुबार मतदार आढळून आल्याने ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला आहे. आता, मतदार यादीचा (Voter list) सुधारीत कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय. यापूर्वी अंतिम मतदार यादीसाठी 5 डिसेंबर ही तारीख होती, आता 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2025 असणार आहे. प्रारूप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 असेल. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे 15 डिसेंबर आणि मतदान केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 22 डिसेंबर 2025 असणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती. त्यानंतर, ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली. मात्र, या यादीत घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारुप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता. त्यानुसार, नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी

ठाकरेंचा दाव खरा, मुंबईत 11 लाख दुबार मतदार

मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळही मागितला. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोनदा-तीनदा नव्हे, तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहितीही समोर आली आहे. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहे. त्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुबार मतदार असल्याचा केलेला दावा खरा असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर, आता निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार यादी जाहीर करण्याचा सुधारीत कार्यक्रम हाती घेतली आहे. त्यानुसार, 3 डिसेंबरपर्यंत आता मतदार यादीवर हरकती व सूचना घेण्यात येतील.

मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच

आणखी वाचा

Comments are closed.