महाराष्ट्राच्या मुला-मुलींचा खो-खोमध्ये झंझावात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

45व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत आपली नॉनस्टॉप विजयी घोडदौड कायम राखली. पारुल विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत दोन्ही संघांनी साखळी सामन्यांत दणदणीत विजयासह गटात अव्वल स्थान पटकावले.

महाराष्ट्राच्या मुलींनी दादरा-नगर हवेलीचा 60-8 असा धुव्वा उडवत तब्बल 52 गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात धनश्री तामखडेने 18 गुणांची तुफानी कमाई करत प्रतिस्पर्ध्यांची बचावफळी फोडली. मुलांनीही मैदानावर आक्रमकतेचा जणू धुमाकूळ घातला. अरुणाचल प्रदेशला 64-8 असे लोळवत 56 गुणांनी विजय नोंदवला. विनायक भांगेने 16 गुणांसह विजयाचा पाया रचला, तर आशिष गौतमने 10 गुणांची भर घातली. छत्तीसगढला 34-10 असे नमवून 24 गुणांनी, तर मेघालयाला 39-16 असे नमवले. मेघालयाविरुद्ध पार्थ देवकतेने 14 गुणांची कमाई केली.

Comments are closed.