राज्यात सायबर फ्रॉडमुळे 7,634 कोटींचे नुकसान, ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं?

मुंबई : राज्यातील सायबर फसवणुकीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असून 2024 मध्ये 8,947 प्रकरणं घडली. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे 7,634 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेल आणि जेन्स लाईफ यांनी संयुक्तपणे एक व्हिडीओ मालिका तयार केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस महाउपनिरीक्षक संजय शिंत्रे यांनी संवाद साधला आहे.

महाराष्ट्र सायबरने नमूद केले आहे की, सायबर गुन्ह्यांच्या दररोज 5000 तक्रारी नोंदल्या जातात. याचा अर्थ दर मिनिटाला 4 सायबर गुन्हे घडत आहेत. सध्या सगळ्यात जास्त आढळणारा घोटाळा म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’, ज्यामध्ये गुन्हेगार स्वतः कायदा अंमलबजावणी अधिकारी असल्याचे सांगून आणि कायदेशीर कार्यवाहीच्या धमक्या देऊन वृद्धांकडून पैसे उकळतात.

काय सांगतेय आकडेवारी?

– देशभरात 12 लाखांपेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 11,333 कोटी रुपयाच्या नुकसानाची नोंद आहे.
– 2024 मध्ये, फक्त महाराष्ट्रात 8,947 सायबर प्रकरणे नोंदण्यात आली आहेत. यावरून डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांचे वाढते प्रमाण दिसून येते.
– पुण्यात सर्वाधिक आर्थिक नुकसान रु. 6,707 कोटी रु. झाल्याची नोंद आहे.
– नागपुरात 63.85 कोटी रु. च्या फसवणुकीची 212 प्रकरणे आहेत.
अदृषूक मुंबईत सर्वाधिक 4849 प्रकरणे नोंदण्यात आली आहेत.

महाराष्ट्र सायबरचे पोलीस महाउपनिरीक्षकसंजय शिंत्रे यांनी ज्येष्ठ नागरिक कसे फसवणुकीला सहज बळी पडू शकतात यावर प्रकाश टाकताना म्हटले, “भारतात 15 कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे डिजिटल ज्ञान मर्यादित असते आणि आर्थिक संपत्तीपर्यंत पोहोच असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना सायबर गुन्ह्यांसाठी प्रामुख्याने लक्ष्य बनवले जाते. डिजिटल अरेस्टच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणतेही सरकारी खाते किंवा पोलीस, विमानतळ, कस्टम्स, इन्कम टॅक्स, CBI, क्राइम ब्रांच, CID, ED सारख्या कायदा अंमलबजावणी एजन्सी कधीही व्हिडिओ कॉल मार्फत चौकशी करत नाहीत.”

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या सक्रिय उपाययोजनांवर भर देत संजय शिंत्रे म्हणाले की, “या वाढत चाललेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खास सायबर गुन्हे हाताळणारी केंद्रे स्थापित केली आहेत. ही भारतातील एक अशी व्यवस्था आहे, जेथे गुन्ह्याला बळी पडणारा माणूस आमच्या हेल्पलाइन नंबरमार्फत 24 तासात केव्हाही गुन्हा नोंदवू शकतो. या वाढत्या घोटाळ्यांविषयीचे मार्गदर्शन सतत प्रकाशित करून आम्ही नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करत आहोत. आम्ही एक समर्पित प्लॅटफॉर्म विकसित केला आहे, जेथे बळी पडलेली व्यक्ती तक्रार नोंदवून तत्काळ तपास सुरू करवू शकते.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा पेमेंट करण्याची डेडलाइन दिली जाते तेव्हा नेहमीच तो सायबर गुन्हा असू शकतो, हे ध्यानात ठेवा.”

या गुन्ह्यांचा सामना करताना काय करावे याबद्दल सल्ला देताना संजय शिंत्रे म्हणाले, “सायबर गुन्हेगार सतत आपल्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे जागरूकता ही बचावाची पहिली पायरी आहे. भारत सरकारने 26 लाखांपेक्षा जास्त बनावट मोबाइल नंबर ब्लॉक केले आहेत, जे सायबर गुन्ह्याविरुद्धच्या लढ्यातील एक लक्षणीय पाऊल आहे. ज्येष्ठ नागरिकांना अधिकृत मार्गदर्शिकांची माहिती असली पाहिजे, त्यांनी आपले मोबाइल सुरक्षित ठेवून डिजिटल स्वच्छता राखली पाहजे आणि अज्ञात कॉल आणि मेसेज नेहमी तपासून घेतले पाहिजेत. काहीही संशयास्पद वाटल्यास कुटुंबातील एखाद्या विश्वासू माणसाशी बोलावे किंवा आमच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. आपण एकत्र मिळून या धोक्यांवर मात करू शकतो.”

अधिक पाहा..

Comments are closed.