मालमत्ता अन् कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना; आर्थिक स्थिरता आणण्यासाठी राज्य सरक


महाराष्ट्र सरकार मुंबई: राज्य सरकारकडून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Goverment) मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ‘MAHA ARC LIMITED’ कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली. राज्य शासनाच्या मालमत्ता, गुंतवणूक, आणि आर्थिक साधनांचा पुनर्वापर आणि पुनर्रचना करण्याचे काम करणार आहे. राज्याच्या मालमत्तेचा अधिक चांगला आर्थिक उपयोग करण्यासाठी ही कंपनी मध्यस्थी आणि व्यवस्थापन करणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकोषीय स्थैर्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. अनेक मालमत्ता आणि आर्थिक साधनं निष्क्रिय आहेत किंवा त्यांचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो, त्यामुळे शासनाला या संसाधनांवरून अपेक्षित परतावा (returns) मिळत नाही. अशात ह्या कंपनीच्या मार्फत त्याचे विनियोजन केले जाणार आहे. कंपनीच्या स्थापनेसाठी वित्त आणि नियोजन विभागातील आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, प्रधान सचिव (व्यय) ओमप्रकाश गुप्ता, प्रधान सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सचिव (वित्तीय सुधारणा) शेला ए., तसेच इतर सहसचिव आणि उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

राज्य सरकारची असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय काम करणार? (MAHA ARC LIMITED)

  1. राज्याची मालमत्ता व्यवस्थित, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित करणार
  2. निष्क्रिय किंवा अकार्यक्षम मालमत्तांचा आर्थिक पुनर्वापर करणार
  3. शासनाच्या कर्ज आणि देणींचे संतुलन साधणार
  4. राज्याच्या मालमत्तांचा उपयोग वाढणार, सोबतच निष्क्रिय संपत्ती आर्थिकदृष्ट्या सक्रिय होईल
  5. नवीन निधी उभारणीस मदत होणार, सोबतच सरकारला भांडवली बाजारातून पैसा उभारता येणार
  6. कर्ज व्यवस्थापन सुधारणार आणि जुन्या कर्जांचे पुनर्विलोकन करून वित्तीय ताण कमी करता येणार
  7. सरकारला अप्रत्यक्षरीत्या अधिक महसूल मिळू शकतो, ज्यात राजस्व वाढण्यास मदत

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Election मोठी बातमी: दर 20 दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

आणखी वाचा

Comments are closed.