मोठी बातमी! विधानपरिषदेतील रिक्त जागांसंदर्भात हालचालींना वेग; 5 जागांवर कुणाची वर्णी लागणार?
मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेतील (Maharashtra Legislative Council) राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान या रिक्त जागा भरण्या संदर्भात आता हालचाघेतलेनाही वेग आले आहे. दरम्यानस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ५ जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (महाराष्ट्र विधान परिषद)
Maharashtra Vidhan Parishad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य
विधान परिषदेत एकुण 78 सदस्य संख्या आहे. त्यापैकी 55 सदस्य सध्या आहेत तर 23 जागा रिक्त आहेत. यापैकी 14 मे 2026 ला विधान परिषदेच्या आणखी 9 जागा रिक्त होत आहेत. या 9 ही जागा विधानसभा सदस्य यांच्यातून निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत 13 मे रोजी संपत आहे. सध्या विधानसभेत 286 आमदार आहेत त्यामुळे 36 आमदारांच्या मतदानाचा कोठा ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची माहिती आहे.
Maharashtra Legislative Council : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची रचना
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या 78 इतकी आहे. विधानसभेप्रमाणं परिषद दर 5 वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षकांमधून 7 आमदार, पदवीधरांमधून 7 आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा यातून 12 आमदारांची नियुक्ती करतात.
काय आहे राज्यसभेच गणित? (Rajyasabha)
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण 7 जागा 2 एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणार आहेत.
कोणत्या जागा रिक्त होणार आहेत?
- शरद पवार, राष्ट्रवादी, (सपा)
- रामदास आठवले ( भाजपच्या कोट्यातून आरपीआय आठवले गट)
- भागवत कराड, भाजप
- धैर्यशील पाटील, भाजप
- प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना (युबीटी)
- रजनी पाटील, काँग्रेस
- फौजिया खान, राष्ट्रवादी (सपा)
बातमी अपॅडेट होत आहे….
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.