भाजपला मदत करण्यासाठीच आम्ही उठाव केला, ठाकरेंना भाजप जवळ करणार नाही, गुलाबराव पाटलांचं सूचक वक

गुलबाराव पाटील : भाजप ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ करणार नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. ठाकरेंची शिवसेना ही भाजपच्या जवळ आली तर आम्हाला काही समस्या नाही. ज्या काळात भाजपला मदतीची गरज होती, त्या काळात त्यांचे विचार सोडून ते गेले. तेव्हा भाजपला मदत करण्यासाठी आम्ही उठाव केला आहे. त्यामुळं भाजप निश्चितच आमचा विचार करेल असंही पाटील म्हणाले.

जो पडतीच्या काळात आपल्यासोबत असतो तोच आपला खरा भाऊ असतो असेही गुलाबराव पाटील म्हणाले. महायुतीचे 237 आमदार निवडून आले आहेत. 20 आमदार  त्यांचे आहेत. संजय राऊत यांचा कार्यक्रम संपला असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळं ते भाजपशी जवळीक साधत असले तरी मला असं वाटतं की भाजप ठाकरेंच्या सेनेला जवळ करणार नाही असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला. यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली आहे.

कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो

नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबईठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

महत्वाच्या बातम्या:

Vijay Wadettiwar : शिवसेना स्वतंत्र लढणार, काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना भेटणार; निवडणुकांबाबत वडेट्टीवारांना मांडली भूमिका

अधिक पाहा..

Comments are closed.