Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
ट्रिपल इंजिन सरकारमधली दोन इंजिनं सध्या एकमेकांवर गुरगुरु लागलीयत. निमित्त ठरलंय शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचं ताजं वक्तव्यं. राष्ट्रवादीचे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचं शिरसाटांनी म्हटलं आणि दोन्ही पक्षातल्या वादावरची खपली निघाली. आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदेंकडं शिरसाटांची तक्रार करणार आहेत, तर शिरसाटांना मात्र आपल्या वक्तव्यात काहीच चुकीचं वाटत नाहीय. त्यामुळं हा वाद शमणार की अधिकच पेटणार, असा सवाल उपस्थित झालाय. राष्ट्रवादीत कुणाला स्थान मिळणार, कुणाला डच्चू मिळणार, कुणाची क्लेरिकल मिस्टेक झाली याबाबत अधिकृतपणे स्पष्टीकरण पुढं आलेलं नाही. आता ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब असली तरी पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढलीय. काही लोक निश्चित आमच्या संपर्कात आहेत. पक्षात कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं, असा प्रश्न पडलाय. त्यांच्या पक्षात काय घडतंय, हे थोड्याच दिवसात कळेल.राष्ट्रवादीचे नेते संपर्कात असणं आणि पक्षातील नेतृत्वाविषयी त्यांना प्रश्न पडलेला असणं या शिरसाटांच्या वक्तव्यातील दोन गोष्टी राष्ट्रवादीला चांगल्याच झोंबल्यात. त्यापूर्वीही शिरसाटांनी राष्ट्रवादीला चिमटे घेतले होते.पण शिरसाटांच्या ताज्या वक्तव्यानं राष्ट्रवादीची पडद्यामागची नाराजी चव्हाट्यावर आलीय.
Comments are closed.