Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

मुंबईतल्या वांद्रेमधल्या गरीब नगरच्या अनधिकृत झोपड्यांवर, अखेर रेल्वे प्रशासनानं बुलडोझर चालवलाय… या कारवाईमुळे कोणत्या प्रकल्पांचा मार्ग मोकळा झालाय? सर्वसामान्य मुंबईकरांना या कारवाईबाबत नेमकं काय वाटतंय? ज्यांची झोपडी तुटली त्यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी सचिन लाड यांनी… वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टी हटाव कारवाईचा आज चौथा दिवस आहे….पश्चिम रेल्वेकडून ही मोहीम आजही सुरू ठेवण्यात आली…. अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आला असून ९० टक्के काम पूर्ण झाले असून उद्यापर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे…आज सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं.. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईदरम्यान परिसरात तणाव निर्माण झाला होता.(( कारवाईला विरोध करत काहींकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पाहुयात हा ग्राऊंड झिरो रिपोर्ट

Comments are closed.