जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील

जळगाव : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये जळगाव स्थानिक स्वराज संस्थेची जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी केल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची आपण मागणी केली असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे.

जळगावची जागा शिवसेनेला मिळावी : गुलाबराव पाटील

जळगावच्या जागेसंदर्भात आणि मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीसंदर्भात मागणी केली असली तरी या बाबतचा निर्णय वरच्या पातळीवर चर्चा होऊन घेतला जाईल,तो जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असणार असल्याचं ही पाटील यांनी म्हटलं आहे.

जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने देखील दावा केला आहे. शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी मग ते भाजपसाठी असो की शिवसेनेसाठी असो जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना महायुती म्हणून मान्य असेल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

वरच्या पातळीवर जागांमध्ये फेरबदल झाले तर जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. आतापर्यंत भाजपला खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेला आहे. यापूर्वी दोन वेळा शिवसेनेने ही जागा लढवली असून जिंकली सुद्धा आहे. नंतरच्या काळात ती जागा भाजपकडे गेली होती.   त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

विधान परिषदेच्या जागेसाठी सुरुवातीला महायुती म्हणूनच जागा लढवण्यावर ठाम आहोत. काही गोष्टींमध्ये मी बंधन पाळणारा माणूस आहे असे देखील मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे

ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसंदर्भातील ऑपरेशन टायगर संदर्भात विचारलं असता गुलाबराव पाटील यांनी शेवटी ते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही.

किशोर पाटील यांच्याकडून देखील मुलासाठी विधानपरिषद उमेदवारीची चर्चा करण्यात येत असल्यासंदर्भात गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.  त्यांचा मुलगा काय आणि माझा मुलगा काय मात्र विधान परिषदेसाठी 30 वर्षे वय पूर्ण असावे लागते.., किशोर पाटील यांच्या मुलाचे वय 28 आहे. किशोर पाटील आमदार असल्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती असायला हव्यात, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. पुढं ते म्हणाले की किशोर पाटील यांचा मुलगा शेवटी नात्याने माझा नातू लागतो.

आणखी वाचा

Comments are closed.