आणखी एका मनपात महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित, भाजप 45 ते 50, शिवसेना 18 ते 20 जागा लढणार
अमरावती महायुतीची जागावाटप : नागपूरमध्ये काल (गुरुवार२६ डिसेंबर ) भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) नेत्यांमध्ये युती संदर्भात आणि जागावाटपावर बैठक झाली. या बैठकीला भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय कुटे, भाजप नेत्या नवनीत राणा, माजीमंत्री प्रवीण पोटे, जयंत डेहनकर तसेच शिवसेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप 45 ते 50 जागेवर लढणार आहे. तर 18 ते 20 जागेवर शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टीला 9 ते 12 जागा देण्याचं ठरलंय, अशी माहिती आहे. दरम्यान87 जागेपैकी 75 जागेसाठीच बोलणी सुरू असून ती बोलणी आता अंतिम टप्यात आली आहे. मुस्लिमबहुल भागातील 12 जागेवर अद्याप बोलणी झालेली नाही. फक्त आज अमरावतीत हॉटेल महफीलमध्ये नेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. अशी देखील माहिती आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत (Amravati Municipal Corporation Election 2026) भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टी जागावाटप जवळ जवळ निश्चित झाल्याचे बोललं जात आहे.
नाव राणा : जी महायुती विधानसभेत होती, त्यावर चर्चा, उद्यापर्यंत सगळं स्पष्ट
दरम्यान याच मुद्दयांवर बोलताना भाजप नेत्या नवनीत राणा म्हणाल्या तेआमचे हेच प्रयत्न आहेत की होय महायुती विधानसभेत होती, शिंदे साहेबांना घेऊन ते येथे ठरवायचे आहे. त्यावर बोलणं झालंहे आणि 2017 मध्ये जसे इलेक्शन झाले, त्यानंतर कसे आमदार निवडून आले त्यावर चर्चा झाली, उद्यापर्यंत सगळं स्पष्ट होईल. अशी माहिती नवनीत राणामni दिलीय. तर रवी राणा हे भाजपसोबत 2014 पासून आहेत, त्यामुळे रवीजी भारतीय जनता पक्षासोबतच राहणार आहेत. लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू असं भाजपने सांगितले आहे. तर राष्ट्रवादीसोबतचा निर्णय हे आमचे पक्षाचे नेते ठरवतील आणि बऱ्याच ठिकाणी ज्याप्रमाणे त्यांच्यासोबत युती नाही होत आहे, तसेच अमरावतीत होईल. असेही त्या म्हणाल्या.
MahaVikas Aghadi: अमरावतीत काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मैदानात उतरणार?
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता अमरावतीमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. काल (गुरुवार२६ डिसेंबर ) मुंबईमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत अमरावती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरीष्ठांना इच्छुकांची यादी सादर केलीहे. दरम्यान, वर्तमान राजकीय स्थिती आणि अधिकाधिक जागा जिंकण्याचे समीकरण डोळ्यासमोर ठेवत अमरावती काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार हे तीनही पक्ष मिळून महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्यावर श्रेष्ठींनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसची उबाठा आणि शरद पवार गटासोबत चर्चा सुरू असून एक दोन दिवसात महाविकास आघाडी म्हणून निश्चित होईल, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष बबलू शेखावत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.