स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा इलेक्शन प्लॅन; या नऊ महत्त्वाच्या गोष्टींचं
मुंबई: राज्यातील राजकीय तापमान पुन्हा चढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (local body elections) निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका होण्याची शक्यता असून, सत्ताधारी महायुतीने आधीच रणनिती आखायला सुरुवात केली आहे. शिंदे (मराठी), फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या तिघांनी मिळून स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इलेक्शन प्लॅन केल्याची माहिती आहे. महायुती एकत्र मैदानात उतरून सत्ता टिकवण्याची रणनीती आखली आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधू आणि मविआ आता या महायुतीच्या चक्रव्यूहाला कसे भेदतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.(local body elections)
महायुतीचा इलेक्शन प्लॅन
१ – महायुतीकडून जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती स्थापणार
२- जिल्हा समितीत पालकमंत्री आणि दोन्ही पक्षांचे आमदार व नेतेही
३- आज जिल्हा पातळीवरील समित्यांची घोषणा शक्य
४- जिल्हा पातळीवरील समिती ८ दिवसांत सविस्तर अहवाल देणार
५- जिल्ह्यातील राजकीय स्थिती, महायुतीच्या पक्षांची ताकदीवर अहवालात प्रकाश
६- महायुती अंतर्गत असलेल्या वादाचीही अहवालात सविस्तर माहिती देणार
७- जिल्हा समन्वय समितीचा अहवाल राज्य समिती समोर मांडणार
८- वादाच्या जागा, वादाची कारणे यावर महायुतीचे मुख्य नेते निर्णय घेणार
९- जाहीर तणाव निर्माण होणार नाही याची काळजी राज्य समन्वय समिती पाहणार
जिल्हा पातळीचं गणित कसं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनीती ठरली आहे. महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर समिती निर्माण करणार आहे. या समितीत पालकमंत्री व दोन्ही पक्षांचे नेते असणार आहेत. सोबतच जिल्ह्यातील आमदार व इतरही असणार आहेत. जिल्हा पातळीवरील समिती पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील निवडणुकींच्या अनुषंगाने अहवाल तयार करणार आहे.
जिल्हा समन्वय समिती अहवाल राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार
या अहवालात जिल्ह्यातील परिस्थिती, महायुती आणि महायुतीअंतर्गत असलेल्या पक्षाची ताकद आणि परिस्थिती याचा ही आढावा असणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यात महायुती अंतर्गत वादाची सविस्तर माहिती मांडणार आहे. हा संपूर्ण अहवाल, आढावा जिल्हा समन्वय समिती राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार आहे. राज्य सरकारकडे अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील. कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल.
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कधी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकांसंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.