मोठ्या हल्ल्याचा कट फसला
दिल्लीत ‘आयएसआय’च्या 9 हस्तकांना अटक : मोठे दहशतवादी जाळे उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला असून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या नऊ हस्तकांना अटक केली आहे. हे संशयित दहशतवादी देशात दहशत निर्माण करण्याचा कट रचत होते. दिल्ली आणि मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. अटक केलेले संशयित दहशतवादी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील असून, त्यापैकी काही परदेशी नागरिकही आहेत. मुंबईतील गुन्हेगारी जगताशीही त्यांचे संबंध असल्याचे समोर आले आहे. सुरक्षा यंत्रणा आता सूत्रधार आणि स्थानिक साथीदारांचा शोध घेत आहेत.
तपास यंत्रणांनी अटक केलेले सर्व संशयित दहशतवादी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून भारतात हल्ले करण्याचा कट रचत होते. शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी जगताशी संबंधित नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रs, ग्रेनेड आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे लोक एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते. दिल्ली आणि मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, सरकारी इमारती, मंत्रालय आणि संरक्षण संबंधित कार्यालये ही त्यांची मुख्य टार्गेट होती. तसेच देशभरातील वीज प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांना लक्ष्य करण्याचाही कट रचला जात होता. ही टार्गेट मोठी गर्दी असलेली ठिकाणे आहेत. तपासानुसार, हे दहशतवादी मॉड्यूल बऱ्याच काळापासून तयार होत होते. आरोपी पाकिस्तानस्थित सूत्रधारांच्याही संपर्कात होते. सदर आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबचे असून, यात काही नेपाळी लोकांचाही सहभाग आहे.
शस्त्र ग्रेनेड, स्फोटके जप्त
पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रsही जप्त केली आहेत. अटक केलेले सर्व संशयित दहशतवादी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून भारतात हल्ला करण्याचा कट रचत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून पाकिस्तानमधून आयात केलेल्या स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रही जप्त केली आहेत. त्यांच्याकडून ग्रेनेड आणि अनेक संशयास्पद दस्तावेजही जप्त केले आहेत.
पाकिस्तान बनावटीची स्फोटके
संशयितांकडे पाकिस्तानमधून पाठवलेली स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा परदेशातून कर्मचारी पाठवण्याचा धोका टाळून आणि आपली दुष्ट उद्दिष्ट्यो सहज साध्य करण्यासाठी देशात दहशत निर्माण करण्याकरिता भारतीय नागरिकांचा वापर करत होती. तथापि, दिल्ली पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आणि सर्व नऊ संशयित दहशतवाद्यांना अटक केली.
निधीपुरवठ्यासह भरती प्रक्रियेची चौकशी
दिल्ली पोलीस आता या मॉड्यूलच्या निधीचे स्रोत, भरती प्रक्रिया आणि लॉजिस्टिक सपोर्ट सिस्टीमची चौकशी करत आहे. या कटात कथितरित्या सामील असलेल्या स्थानिक मध्यस्थ आणि परदेशी हँडलर्सच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
Comments are closed.