एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला


नाशिक : डोंगराळे येथील अत्याचाराच्या आरोपीस फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे येथे निवडणूक प्रचारासाठी जात असलेल्या एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवत एका युवकाने डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्यावरावरुन आरोपीला फाशीची मागणी केली. त्यावेळी, एकनाथ शिंदेंनी संवेदनशीलपणा दाखवत युवकांचा संताप समजून घेतला. तसेच, आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे आश्वासन देखील दिले.

डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा आशियाचा बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपळनेर तालुका अध्यक्ष पवन संदनशिव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झळकावला. तसेच, एका दिवसात सरकार बदलू शकतं मग आरोपाला फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत, असेही त्याने म्हटले. यावेळी पोलिसांनी पवन संदनशिव याला रोखले. पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवत पवन संदनशिव यांची भेट घेऊन त्याच्या भावना जाणून घेतल्या. डोंगराळे येथील घटनेत आरोपी असलेल्या  याघटनेत आरोपी असलेल्या नराधमास फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून डोंगराळे येथील घटनेनंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत असून मालेगाव येथील नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं.

पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर माहाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराची गंभीर दखल घेत कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून 10 लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.