‘आम्हाला बाबांचा चेहराही दाखवला नाही,ते कापडातच…’ मंगेश काळोखेंच्या लेकींचा आक्रोश, त्या घटने
खोपोली: रायगडच्या खोपोलीमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (Mangesh Kalokhe death) यांची नऊ दिवसांपूर्वी सकाळी सात वाजता निर्घृण हत्या करण्यात आली होती.काळोखे कुटुंबांनी एकत्र येत घटनेचा निषेध व्यक्त करत सर्व आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केली आहे. मंगेश काळोखे (Mangesh Kalokhe death) यांच्या दोन मुली आणि पुतण्या यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बातचीत करत आरोपींना शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
आतापर्यंत मंगेश काळोखे हत्याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या विनय चव्हाण या मारेकऱ्याला खोपोली पोलिसांनी अटक केली नसल्याची खंत काळोखे यांच्या कुटुंबानी व्यक्त केली आहे. मंगेश काळोखे यांच्या दोन्ही मुलींना आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती, याबाबतीतील धक्कादायक खुलासा त्यांनी केल्याने या हत्या प्रकरणात पुन्हा राजकीय वळण येण्याची शक्यता आहे.(Mangesh Kalokhe death)
Mangesh Kalokhe murder: काळोखेंच्या लेकी पहिल्यांदा बोलल्या, त्या दिवशी घडलेलं सगळंच सांगितलं
“बाबांचा चेहरा सुद्धा आम्हाला दाखवला नाही, त्यांची काय चुक होती. रुग्णालयातून आणलं त्यांना तेव्हाही ते कापडातच होते. त्यांचा शेवटचा चेहरा सुद्धा आम्हाला बघता आला नाही. माझ्या बाबांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे” अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या मुलींनी केली. मुलींची ही मागणी ऐकून उपस्थितीतांचे डोळे पाणावले.
खोपोली येथील नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज (शनिवारी) या हत्येला नऊ दिवस झालेत. फिर्यादीमधील काही आरोपी यांना अटक होणं बाकी आहे. त्यांना अटक करावी आणि फाशी द्यावी, अशी मागणी मंगेश यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलताना केली.
Mangesh Kalokhe murder: ‘छोट्या मुलीला शाळेत सोडायला गेले अन्…’
मयत मंगेश काळोखे यांची छोटी मुलगी आर्या सातवीला आहे. तर मोठी मुलगी वैष्णवी ही दहावीला आहे. या दोन्ही मुली वडीलांच्या निर्घृण हत्येनंतर भयभीत झालेल्या दिसल्या. आर्या या छोट्या मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना जयाबार समोर मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली होती. “माझे बाबा मला शाळेत सोडायला गेले होते. पण, नंतर ते दिसले नाही. मला बाय केलं आणि निघून गेले. पण, आता ते परत कधी आालेच नाही. माझ्या बाबांना मारणाऱ्यांना फाशीच झाली पाहिजे, असं आर्याने म्हटलं आहे.
Mangesh Kalokhe murder: हत्या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक
खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी सकाळी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मंगेश काळोखे हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. शहरातील जया बार समोर ५ जणांनी काळोखे यांचा पाठलाग करून हल्ला केला. त्यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखेंचा जागेवरच मृत्यू झाला. मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांच्यासह ९ जणांवर गुन्हे दाखल आहे. या हत्येतील एकूण 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास करत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.