वारंवार वादग्रस्त वक्तव्य, तरीही कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना अभय?; राष्ट्रवादीतील नेत्याच्या

मणक्राव कोकेटे: सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभय मिळतंय का?, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. हल्ली प्रत्येकजण मोबाईलमधे व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणे कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षातील एका नेत्यांने एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची घेणार भेट-

आज माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात आज दुपारी भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  त्यानंतर कृषी विभागाच्या सुनावण्यांसाठी माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहेत. पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देखील माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. माणिकराव कोकाटे यांच्या सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजीनाम्याच्या प्रश्नावर, माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

माणिकराव कोकाटे यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्हा रमीच्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं. मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यांना सभागृहात येता येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. 30 सेकंद गेम स्कीप करता येत नाही. माझा व्हिडिओ 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते. मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे, याप्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=YS5WKL3IXHU

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis on Manikrao Kokate : सरकारला ‘भिकारी’म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान; म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.