मुंडे घराण्यात धनंजय मुंडेंनीच दरी तयार केली; पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगेंच


मनोज जरांगे पंकजा मुंडे वर धनंजय मुंडे : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या राजकीय वारसदारावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी छगन भुजबळांना थेट सल्ला दिला आहे की, ‘अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ-बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका.’ तसेच, दुसऱ्यांच्या घरात वारस ठरवण्याआधी स्वतःच्या वारस मुलगा की पुतण्या हे ठरवावे, असा म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. तर पंकजा मुंडे यांना जनतेने आणि समाजाने संघर्षानंतर वारसदार म्हणून स्वीकारले आहे, असे देखील प्रकाश महाजन म्हणाले. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal: मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वैचारिक मतभेद असू नयेत. देशात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केलेले आहेत. भुजबळ बीडला आला आणि भेद पसरवून गेला. मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? असा सवाल त्यांनी छगन भुजबळ यांना विचारला.

Manoj Jarange Patil on Pankaja Munde धनंजय मुंडे : पंकजा मुंडेंचे वारस कोण?

तो मिळेल त्या संधीत त्या पोरीला चेंगरायचं बघतो, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंची बाजू घेत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली आहे. आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं, हे खऱ्या वारसाला कळत नाही का? खरा वारसा त्याच्यासोबतच हिंडत फिरतो. मग आपल्या सारख्याने काय बोलावं? खऱ्या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे हे म्हणण्याची गरज नाही. पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. नुसती बहीण-बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही. त्यांनीही तुम्हाला आपलं समजायला हवं, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा

मुंडे बंधू-भगिनींमध्ये मिठाचा खडा टाकू नका; धनंजय मुंडेना गोपीनाथरावांचे राजकीय वारसदार ठरवणाऱ्या छगन भुजबळांवर प्रकाश महाजनांचा हल्लाबोल

आणखी वाचा

Comments are closed.