मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकरसह 9 जणांवर तडीपारीची कारवाई; जालन्यात प्रशासन अँक्शन मोडवर
मनोज पीक _> एस _________________: जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.
2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल-
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा आरोपींवरती परभणी, जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत. अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखीही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची देखील माहिती मिळत आहे.
यांच्यावर झालीय तडीपारीची कारवाई
१) विलास हरिभौ खेदकर, २) केशव माधव वायभात,)) सान्योगकर सोलोका,)) गजानन गणत टिकन, मासुरराव टॉर
मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकरवर देखील तडीपारीची कारवाई त्याच्यावर पुढील गुन्हे दाखल आहेत-
विलास हरिभाऊ खेडकर(मनोज जरांगे यांचा मेहुणा)
जालना , बीडआणि परभणी जिल्ह्यातून याला सहा महिन्यासाठी तडीपार….
1) 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
2) 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल….
3) 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा.
4) 2023 रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणी च्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..यामुळे विलास खेडकर याला जालना , छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.