देवेंद्र फडणवीस यांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ त्यांनी केलंय : मनोज जरांगे
मनोज जरंगे पाटील ज्या ज्या वेळेस मुंबईला गेलो, तेव्हा हैदराबादचा जीआर (GR) काढला अंबलबजावणी केली. तेव्हा आम्ही सरकारचा कौतुक केलं. त्याच्यानंतर 108 प्रमाणपत्र वाटली. मात्र त्याच्यानंतर काय? सातारा संस्थानचा जीआर एक महिन्यात काढू म्हटले होते. त्याला आठ महिने उलटून गेले. राज्यातील सर्व गुन्हे मागे घेऊ म्हटले ते अद्याप का घेतले नाहीत? ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांना व्हॅलिडीटी दिली जात नाही. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. हे सर्व नेमकं काय चाललंय? मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल आहे. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मतं आणि नेते मराठ्यांचे लागतात, मात्र त्याच भाजपमधल्या (BJP) मराठ्यांचे लेकरं बाळ मोठे होऊ नयेत ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची द्वेषाने भरलेली असल्याचे सांगत, मराठा आंदोलक मनोज jarange पाटील (मनोज जरंगे पाटील) यांनी जोरदार टीका केली आहे.
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणीसांमुळे नेकनुरला एकाचा बळी गेलाy, मराठ्यांपुढे या राज्यात शहाणपणा चालत नाही
देवेंद्र फडणीसांमुळे नेकनुरला एकाचा बळी गेलाहे. देवेंद्र फडणवीस यांची वर्तवणूकच चांगली नाही. खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही त्यांच्यावर दबाव आणणार. फक्त आम्ही न्याय मिळेपर्यंत हटणार नाहीत. मराठ्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे. तुम्हाला वाटत असेल सत्ता आहे, पण मराठ्यांपुढे या राज्यात शहाणपणा चालत नाही. आंदोलनाची तारीख डिक्लेअर होईल. सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं आहे की हे फडणवीस आपल्या लेकरांचं वाटोळ करत आहे. आम्ही ताकतीने हा मुद्दा लावून धरू. बघू हे लोक किती शहाणपणा करतात ते. असेही मनोज jarange पाटील म्हणाले.
सातारा संस्थानचा गॅझेटेडचा जीआर कसा निघत नाही. आता आम्ही बघतो यांच्याकडे, यांना दाखवतो आम्ही कोण आहोत ते. देवेंद्र फडणवीस यांनी आणखी आमचे बळी घेऊ नये. आमची लेकरं सोन्यासारखी आहे. तुमचे लेकरं जसे तुम्हाला आपले वाटते, तसे आमचे लेकर सुद्धा आम्हाला सोन्यासारखे वाटतात. तुमचं लेकरू तेच लेकरू आणि दुसऱ्याचे लेकरू मेल तरी चालेल, या भूमिकेतून देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर पडावं. असेही मनोज jarange पाटील म्हणाले.
मनोज जरंगे पाटील : आंतरवारी सराटीतील बैठकीची तारीख, आंदोलन आज जाहीर करणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून आज (१६ मध्ये) अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची बैठक होणार आहे. कुणबी नोंदी असलेल्याना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावंतसेच व्हॅलेडीटी तात्काळ देऊन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, शिंदे समितीने रेकॉर्ड शोधावेत, यासह इतर मागण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याचा निर्धार मनोज जरंगे यांनी केला आहे, आज सकाळी दहा वाजता मनोज jarange यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक ठेवली असून या बैठकीमध्ये आंदोलनाची तारीख जाहीर होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार का? का वेगळा आंदोलनाचा मार्ग निवडणार, हे बैठकीनंतर मनोज जरांगे स्पष्ट करतील.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.