.तर तीन लाख ट्रक गुलालाने फडणवीसांचा बंगला रंगवून टाकतो, ओसएडींना मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Manoj Jarange Patil & Devendra Fadnavis: मराठा आणि कुणबी एक आहेत, याचे सरकारी दस्ताऐवज सापडले आहेत. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा आरक्षणासाठी रोडमॅप वगैरे कशाला हवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरुन टाकतो. त्यांनी कधी इतकी फुलं बघितली नसतील, वास मारणारी, बिगरवासाची सगळी फुलं आणतो. फडणवीस साहेबांचा बंगला नाय गुलाबाच्या पाकळ्यांनी भरुन काढला तर नाव बदलेन माझं. उगाच गोरगरीबांच्या लेकरांची का नाराजी घेता? मला जेलला टीका, मी सडायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्हाला आरक्षण देतो, तुमच्या अंगावरचं कातडं काढून द्या, तरीही मी तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर राजेंद्र साबळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी दादांची भेट घेण्यासाठी आलो होतो. दादांचा मार्ग कसा आहे, त्या रस्त्यात मराठा बांधवांना अडचण व्हायला नको त्यासाठी मी इकडे आलो होतो. मुंबईत मोठ्याप्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे मराठा बांधवांची अडचण व्हायला नको. मुंबईला येताना जो मार्ग आहे, त्यामध्ये कोणतीही अडचण यायला नको. रस्त्यामध्ये ट्रॅफिक लागेल. यापूर्वी मनोज जरांगे नवी मुंबईपर्यंत आले आहेत, तो अनुभव मी जाणून घेतला. त्यांचा मुक्काम कुठे असेल, त्यांचा मार्ग कसा असेल, या सगळ्याविषयी मी त्यांच्याकडून माहिती घेतली. मुंबईत मोठ्याप्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गणेशभक्त आणि मराठा बांधव दोघांनाही त्रास होऊ नये, हे मी त्यांना सुचवले. मनोज दादांनी मी आंदोलनाबाबत तशी विनंती केली आहे. आता तुम्ही कॅमेरे बाहेर घेऊन जा, मग मी त्यांच्याशी चर्चा करेन, असे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी म्हटले. मात्र, मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच राजेंद्र साबळे यांच्याशी संवाद साधला.
https://www.youtube.com/watch?v=catoh5terle
आणखी वाचा
देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी मनोज जरांगेंच्या भेटीला, मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलणार?
आणखी वाचा
Comments are closed.