शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, 29 ऑगस्ट मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा
बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचामनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
बातमी अपडेट होत आहे..
अधिक पाहा..
Comments are closed.