तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज jarange पाटील (मनोज श्लांगे) यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. jarange पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वत: jarange पाटलांनी धनंजय मुंडेंवर केला आहे. आता, श्री क्षेत्र नारायण गड यांच्यावतीने उभारल्या जाणाऱ्या मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा मनोज jarange पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी, भूमिपूजन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं, तर अजित पवारांना देखील इशारा दिला आहे. तसेच, आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को चाचणी करावी, अशी मागणी देखील jarange पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक बनविण्यात आलंय. त्यासंदर्भाने मनोज jarange यांना प्रश्न विचारला असता, धनंजय मुंडेला डोनाल्ड ट्रम्प सह पाठवलं तरी मला हरकत नाही. मात्र, त्याला आधी तपासणीसाठी पाठवावे, असे jarange पाटील यांनी म्हटले. तसेच, अजितदादा तुमच्या मुलावर घातपात केला असता तर तुम्ही गप्प बसले असते का? त्यामुळे का पांघरूण घालता असा सवालही अजित पवार यांना विचारला आहे. 2029 ला याचा पश्चाताप होईल. मागील निवडणूक आठवा, तुमच्या तोंडाचे पाणी पळाले होतं हे मी माध्यमांसमोर बोलेल, त्याला पाठवा नाही तर 2029 ला तुमची फजिती होईल,असा इशाराच jarange पाटील यांनी दिला. धनंजय मुंडेला असे चाळे शोभत नाहीत, बीडमधून अजितदादा तुम्हाला एक सांगतो त्याला चौकशीसाठी लवकर पाठवा, असे jarange पाटील यांनी म्हटले.
नारायण गडावर मी भक्त म्हणून आलो, इथं बऱ्याच सुविधा केल्या जात आहेत. मला जीवे मारण्याचा कट रचला, त्यात नार्को टेस्टची मागणी मी केली नव्हती. धनंजय मुंडे माझ्या घातपातापर्यंत गेले आता सुट्टी नाही, लपायचं नाही दोघेही सोबत जाऊ, असे म्हणत नार्को टेस्टची करायचीच आता सगळंच बाहेर येऊ द्याअसे jarange पाटील यांनी म्हटले. कांचन नावाचा त्यांचा माणूस ज्याने या दोघांना घरी येऊन परळीला नेले, ते परळीला गेले म्हणजे परळीत खुनाचा कट शिजला होता. धनंजय मुंडे आणि त्यांच्या साथीदाराने मिळून हा कट रचला हे सत्य उघड होणार आहे. अजित दादाने सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये, प्रत्येकवेळी त्याला वाचवायचं नाही, हे मोठं षडयंत्र आहे, धनंजय मुंडेने या टोकापर्यंत जायला नको होतं. मी आता सोपा नाही, हे एखाद्या स्त्रीप्रमाणे धंदे आहेत, धनंजय मुंडे यांना शेख चिल्लीची उपमा देत jarange पाटील यांनी अजित पवारांनाी इशारा दिला. मुख्यमंत्र्यांना देखील मी सांगितले आहे, यात माघार नाही.
मी निरोपही पाठवले होते (manoj jarange patil)
मी चुकलो कुठे हे मला दाखवून द्या. मी बहीण भावाला कधीही विरोध केला नाही, ते माझ्यावर टीका करत असताना मी त्यांना निरोप देखील पाठवले. निरोप देण्यासाठी त्यात दोन अधिकारी आणि मोठा नेता होता. पण, ते मराठा समाजावर अन्याय करतात मग मला बोलावं लागेल, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात असे नव्हते. चुकीच्या गोष्टींना धनंजय मुंडेंनी साथ दिली, पाठीशी घातले. पंकजा मुंडे म्हणाल्या शांतता राहिली पाहिजे ही गोष्ट आम्हाला पटली. पूर्वी ऊसतोड मुकादम-कामगार प्रामाणिक होते. मात्र, धनंजय मुंडेंनी नंतर त्यांना बळ दिले, आता नार्को टेस्टमधून दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्याअसेही jarange पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
Comments are closed.