मनोरमा खेडकरने परस्पर अटकपूर्व जमीन मिळवला, नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही; क्लिनर अपहरण प्रकर
नवी मुंबई: क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) नवी मुंबई पोलिसांना हाती लागली नसली तरी तिने वकिलासोबत थेट न्यायालयात हजेरी लावून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडेच तिच्या न्यायालयात हजेरी लावण्याची माहिती नव्हती, असे स्वतः पोलिसांनीच स्पष्ट केले आहे.
दिलीप खेडकरने नवी मुंबईतून एका क्लीनरचे अपहरण केल्यानंतर रबाळे पोलीस तपासासाठी थेट पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. त्यावेळी मनोरमा खेडकरने पोलिसांना, “तुम्ही पोलीस स्टेशनला जा, मी नवऱ्याला घेऊन येते,” असे आश्वासन दिले होते. पोलिसांनी तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला. मात्र त्यानंतर दिलीप व मनोरमा खेडकर दोघेही पसार झाले होते.
पोलिसांचा तपास अनेकदा संशयास्पद
खेडकर दाम्पत्याच्या प्रकरणांत पोलिसांचा तपास अनेकदा संशयास्पद ठरल्याचे दिसून आले आहे. UPSC फसवणूक प्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचने पूजा खेडकरविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, ती दीड वर्षे पोलिसांना सापडलीच नाही. उलट न्यायालयाने तिला अटकेपासून संरक्षण दिले होते. याच दरम्यान मनोरमा आणि दिलीप खेडकर यांनी एका शेतकऱ्याला धमकावल्याचे प्रकरणही समोर आले होते. त्यावेळी दिलीप खेडकरला अटकपूर्व जामीन मिळाला होता, तर मनोरमा खेडकर मात्र बराच काळ पोलिसांच्या हाताशी लागली नव्हती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर यांनी बेलापूर कोर्टात जामीनसाठी अर्ज केला होता, याप्रमाणे, या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे स्पष्ट होत आहे. क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असूनही मनोरमा खेडकर थेट न्यायालयात पोहोचते आणि पोलिसांना चकवा देत अटकपूर्व जामीन मिळवते. त्यामुळे पोलिसांच्या तपासातील ढिलाईवर व शंका कुशंका वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे खेडकर कुटुंबाविरोधात सुरू असलेले वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलीस नेमकं काय करत आहेत आणि आरोपींना वारंवार दिला जाणारा कायदेशीर आधार याबाबत सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मनोरमा खेडकरने पोलिसांवर सोडले कुत्रे
पोलीसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलीसांवर घरातील कुत्रे सोडले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. काही वेळानंतर प्रल्हाद कुमार याला पोलीसांच्या हवाली करण्यात आले. मात्र याच दरम्यान, दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.