धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटींचा गांजा जप्त
गुन्हे बातम्या ठेवा: पुण्यात चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी सुरु असल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. एअर इंटेलिजन्स युनिट ने केली 5 जणांना अटक केली आहे. बँकॉकवरुन पुण्यात आलेल्या विमानातून गांजाची तस्करी सुरु होती. पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिट ची या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.
4 प्रवासी हे बँकॉक ते पुणे हा विमान प्रवास करून पुणे विमानतळावर उतरले होते
मिळालेल्या माहितीनुसार, 4 प्रवासी हे बँकॉक ते पुणे हा विमान प्रवास करून पुणे विमानतळावर उतरले होते तर एक व्यक्ती या चौघांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. 4 जणांच्या ताब्यातून गांजा जप्त केला असून ते सर्व जणं झारखंड या राज्यातील नागरिक आहेत तर जो व्यक्ती त्यांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता तो रत्नागिरी जिल्ह्याचा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
11 फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर 5.4 करोड रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा अटक करण्यात आलेला आरोपी हा बँकॉक वरून पुण्यात आला होता.
चार जणांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आलं होतं
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉक ला गेलेल्या या चार जणांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आलं होतं. तिथे गेल्यावर त्यांना तुम्ही संधी गमावली असून तुम्हाला आता नोकरी देता येणार नाही असं सांगण्यात आलं आणि परतीच्या वेळी प्रत्येकाला एक चॉकलेटचा डबा देण्यात आला ज्यामध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला. एअर इंटेलिजन्स युनिट कडून या प्रकरणाचा सगळ्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
गांजा तस्करीच्या घटानांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठ दिवसाखाली जळगाव जिल्ह्यात देखील गांजा तस्करीची घटना घडली आहे. जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनातून स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत . ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते . फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत .पहूर पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे
आणखी वाचा
Comments are closed.