अनाया बांगरला महिला क्रिकेटमध्ये खेळवणे हास्यास्पद – मरिझान कॅप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मरिझान कॅपने हिंदुस्थानच्या अनाया बांगरला ऑस्ट्रेलियामध्ये महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. तिने म्हटले आहे की, अनायासारख्या खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये परवानगी देणे ही निव्वळ हास्यास्पद गोष्ट आहे. कारण अनायासारख्या व्यक्तींना महिला क्रिकेटमध्ये परवानगी कोणत्या आधारावर देणार, हे अनाकलनीय आहे. हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन हा मुंबईमध्ये क्रिकेट खेळत होता. त्यानंतर त्याने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला आणि आर्यनची अनाया झाली. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता तिला महिलांच्या कम्युनिटी आणि प्रीमियर क्रिकेटमध्ये खेळण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे एलिट महिला क्रिकेटमध्ये खेळण्याचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. पण अनयाने स्पष्ट केले की, कोणत्याही संघात जागेची कोणतीही हमी नाही.

Comments are closed.