क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! आठव्या मजल्यावरून पडून विवाहितेचा मृत्यू; अपघात की घातपात? पोल

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरात एका विवाहित महिलेचा (Pimpri-Chinchwad Crime News)आठव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची (Pimpri-Chinchwad Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नेमके काय घडले, याचा तपास (Pimpri-Chinchwad Crime News) तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. प्रतिभा मनीष शंकर (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडे व्हीटीपी अर्बन लाइफ सोसायटीमध्ये ही घटना घडली. बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.(Pimpri-Chinchwad Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा शंकर या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्या खाली पडत असतानाचे दृश्य काही नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद (Pimpri-Chinchwad Crime News) झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केली का, की हा अपघाती मृत्यू आहे, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.(Pimpri-Chinchwad Crime News)

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून संबंधित कुटुंबीय, शेजारी तसेच सोसायटीतील नागरिकांची चौकशी सुरू आहे. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेमुळे सोसायटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.(Pimpri-Chinchwad Crime News)

Pimpri-Chinchwad : नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. एका उच्चभ्रू इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका 34 वर्षाच्या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विवाहित महिला इमारतीच्या आठव्या वरून पडत असतानाची दृश्य मोबाईल कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील काकडे वीटीपीआर अर्बन लाइफ सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेत प्रतिभा मनीष शंकर व 34 वर्ष या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल दुपारी दीड वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिभा मनीष शंकर या महिलेने घरगुती वादातून आत्महत्या केली का ? तिचा अपघाताने खाली पडून मृत्यू झाला?  या विषयाचा तपास आता तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. मात्र सध्या तिच्या मृत्यू प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.