विवाहितेचा मृत्यू; दोघांना दणका
पुण्यातील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात सासरा आणि नणंदेने अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. महिलेच्या कथित आत्महत्येमागे हत्येची शक्यता असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांनी नोंदवले.
रेखा सुतार या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सुरुवातीला पुणे येथील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता, मात्र तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या. प्रथमदर्शनी पुराव्यांवरून मृत महिलेवर निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती आणि तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा कथित दुर्भावनापूर्ण प्रयत्न करण्यात आला होता, असे न्यायालयाने निर्णय देताना नमूद केले. मृत महिलेच्या भावाच्या वतीने ऍड. सत्यम निंबाळकर यांनी न्यायालयात जोरदार बाजू मांडली.
Comments are closed.