Chandrapur News – चंद्रपुरात सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन जण गंभीर जखमी
चंद्रपूर शहरातील रहमतनगर रोडवरील मसीहा लॉन येथे मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले असून, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सिलेंडरची अवैधरीत्या रिफिलिंग सुरू असताना हा स्फोट झाला. जखमी झालेले दोघेही रिफिलिंगचे काम करणारे कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Comments are closed.