मॅट रेनशॉची विजय हजारे-सेहवाग यांच्या खास क्लबमध्ये एंट्री, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'ही' कामगिरी केवळ 11 खेळाडूंनी केली
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याचे श्रेय जाते ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मॅट रेनशॉ याला, ज्याने डर्बन कसोटीच्या पहिल्या डावात ३९७ चेंडूंचा सामना करून १९० धावांची आणि तिसऱ्या डावात ८२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याने २७२ धावा केल्या आणि दोन विकेट्सही घेतल्या. त्यामुळे तो एका खास यादीत सामील झाला आहे. यामध्ये विजय हजारे आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीय दिग्गजांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ९ ऑक्टोबरला डर्बन येथे पहिल्या कसोटीत भिडले. २०१८ च्या त्या वादग्रस्त कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत पोहोचला होता आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने यजमानांना पराभवाचा धक्का दिला.
पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने २१४ धावांनी जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाची ११ कसोटी सामन्यांची विजयी मालिका खंडीत केली. या सामन्यात मॅट रेनशॉची कामगिरी लक्षवेधी ठरली. तसेच तोच या सामन्याचा सामनावीर ठरला. या सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याच्या एका खास यादीत समावेश झाला आहे.
रेनशॉ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात २५० पेक्षा अधिक धावा करणारा आणि दोन किंवा अधिक विकेट्स घेणारा ११ वा खेळाडू ठरला. तसेच अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचे तीन, श्रीलंकेचे दोन खेळाडू आहेत आणि ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचे प्रत्येकी एक-एक खेळाडू आहेत.
एकाच कसोटी सामन्यात २५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि २ किंवा २ पेक्षा अधिक विकेट्स घेणारे खेळाडू
भारत – विजय हजारे विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऍडलेड, १९४८
वेस्ट इंडिज – फ्रॅंक वॉरेल विरुद्ध इंग्लंड, नॉटिंघम, १९५०
भारत – विनू मंकड विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, १९५२
पाकिस्तान – जावेद मियांदाद विरुद्ध न्यूझीलंड, कराची, १९७६
श्रीलंका – सनथ जयसूर्या विरुद्ध भारत, कोलंबो, १९९७
भारत – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध बांगलादेश, चटगाव, २००९
इंग्लंड – बेन स्टोक्स विरुद्ध वेस्ट इंडिज, मॅनचेस्टर, २०२०
न्यूझीलंड – रचिन रवींद्र विरुद्ध दक्षिण आफ्रिका, माउंट माउंगानुई, २०२४
दक्षिण आफ्रिका – वियान मुल्डर विरुद्ध झिम्बाब्वे, बुलवायो, २०२५
ऑस्ट्रेलिया – मॅट रेनशॉ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२६
(मॅट रेनशॉने 272 धावा केल्या आणि एसए विरुद्ध डर्बन कसोटीत 2 विकेट घेतल्या, विजय हजारे आणि वीरेंद्र सेहवागच्या अद्वितीय क्लबमध्ये प्रवेश केला)
Comments are closed.