सासऱ्याने छातीला हात लावला, फॉर्च्युनर मागितली; थोरली सून मयुरीच्या कुटुंबीयांचे सहा महिन्यांपू
मयुरी जगटॅप कौटुंबिक पत्र: सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane Death) (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. तर हगवणे कुटुंबियांकडून त्यांची मोठी सून मयुरी जगताप (Mayuri Jagtap) हिला देखील मारहाण करण्यात येत होती. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी जगताप हिच्या आईने केला होता. तर आता मयुरी जगताप हिची आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेले सहा महिन्यापूर्वीच पत्र समोर आलं आहे.
या पत्रात हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी राज्य महिला आयोगाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. दि. 6 नोव्हेंबर 2024 ला हे पत्र लिहिलेले होते. मयूरी जगताप हगवणे हिला तिच्या सासरच्याकडून छळ केला जात असल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी दखल का घेतली नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय म्हटलं होतं पत्रात?
प्रति,
अध्यक्षा,
महाराष्ट्र राज्य महिला आयोग
महाराष्ट्र राज्य, मुंबई
विषय : आमच्या मुलीस तिच्या सासरवाडीतुन होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देणे बाबत.
अर्जदार : श्रीमती. लता राजेंद्र जगताप (आई)
कु. मेघराज राजेंद्र जगताप (भाऊ)
सर,
माझी मुलगी सौ. मथुरी सुशील हरवणे हीचे 20 मे 2022 रोजी श्री. सुशील राजेंद हगवणे रा. भुकुम ता. मुळशी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधी नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फ़ॉच्यूनर पाहिजे व पैसे पाहिजे, असा मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करूण तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना या घटना वारंवार घडत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे व दीर शशांक राजेंद्र हगवणे व नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण करुण तिला धमकी दिली.
तुला, वडिलांना तुझ्या अपंग भावास व आईस आम्ही मारहाण करू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकड करू शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठींबा आहे. अशा धमक्या देऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा आम्ही घरघुती सामंजस्याने हे वाद मिटवत होतो. त्यानंतर 18/02/2024 रोजी
पौंड पोलिस स्टेशन ता, मुळशी येथे तक्रार दाखल केली. परंतु त्यावेळी तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी समाज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासऱ्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. त्याच्या पतीचा या गोष्टीस नकार असल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते. दि. 06/11/2024 रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले. मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्या कडे ये या भाषेत मुलीला शिवीगाळ केला. हे सर्व होत असताना मुलीने मोबाइलमध्ये रेकोर्डिंग चालू केले होते. हे कळताच तिचा दीर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिचा मोबाईल हिसकाऊन पळ काढला मुलगी मोबाईलसाठी त्याच अवस्थेत त्याचा पाठलागू करत होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डसुद्धा झाली आहे.
तिच्याकडे कोणालाही संपर्क करायचे साधन नसल्याने हतबल परिस्थितीमध्ये ती पोलिसात तक्रार दाखल करू शकत नव्हती. याचा फायदा घेत तिची सासू व नणंद यांनी यांनी पोलिस स्टेशनला मुलीची तक्रार दिली. व इतर अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जात नमूद करता येऊ शकत नाही. आमची विनंती आहे की, आमच्या अर्जाची तत्काळ दखल घ्यावी व आमच्या असहाय्य कुटुंबास कायद्याद्वारे संरक्षण देऊन आमच्या मुलीस न्याथ घावा, ही नम्र विनंती, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.