कानाखाली मारेन, चमचेगिरी करतो, बडतर्फ करेन, पगार कोण देतो? बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या
परभणी : महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या मंचावरुन एका ग्रामसेवकावर संतापल्या असल्याचं पाहायला मिळतं. महायुती सरकारमधील काही मंत्री त्यांच्या वक्तव्यांमुळं वादात अडकलेले असतानाच मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना आवरण्याची विनंती केली आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात त्या एका अधिकाऱ्याला कानाखाली मारेन असं म्हणताना पाहायला मिळतं. आताच्या आता बडतर्फ केलं जाईल असं म्हणत त्या संतापल्याचं दिसून येतं.
मेघना बोर्डीकर त्या व्हिडिओत काय म्हणाल्या?
“असं कुणाचं काम केलं ना तर याद राख हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन पगार कोण देते हा आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी”
रोहित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांचा व्हिडिओ पोस्ट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?, असा सवाल देखील रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
रोहित पवार यांची पोस्ट
सभागृहात रम्मी खेळणारे…
पैशांच्या बॅगा भरणारे…
डान्सबार चालवणारे…
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?
देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे.
कृपया यांना आवरा..!
सभागृहात रम्मी खेळणारे…
पैशांच्या बॅगा भरणारे…
डान्सबार चालवणारे…
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट… pic.twitter.com/rrmbqsphde
– रोहित पवार (@rrpspeaks) 2 ऑगस्ट, 2025
https://www.youtube.com/watch?v=gonvrmsxy5y
आणखी वाचा
Comments are closed.