प्रदूषण वाढले; हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात, डोंबिवलीच्या मिलापनगरमधील तलावात निर्माल्य, कचरा आणि फटाक्यांचा खच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मिलापनगर परिसरात सलेल्या तलावात निर्माल्य, कचरा आणि फटाक्यांचा खच पडला आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या तलावाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तलावातील प्रदूषण वाढले असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले हे. फटाक्यांमधील रासायनिक पदार्थांमुळे तलावाचे पाणी प्रदुषित होऊन जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पूर्वीही अनेकदा या तलावातील मासे मृत झाले आहेत.

तलावात निर्माल्य, कचरा आणि देवदेवतांचे फोटो टाकू नेत, यासाठी तीन ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले हेत. तसेच तलावाच्या प्रवेशद्वारांना कुलूपही लावण्यात आले आहे. मात्र काही नागरिक कुंपणावरून निर्माल्य आणि कचरा थेट तलावात फेकत आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास नैसर्गिक झरे असलेला हा तलाव नष्ट होण्याची भिती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी नगरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर केडीएमसी आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी तलावाची पाहणी केली होती.

पालिकेकडून तात्पुरती साफसफाई
महापालिकेकडून केवळ तात्पुरती साफसफाई केली जाते. त्यानंतर तलावाची नियमित देखभाल आणि संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तलावावर देखरेख ठेवण्यासाठी दिवसा एक कंत्राटी कामगार नियुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे. मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन आणि रोटरी क्लब यांनी काही अटी व शर्तीवर तलावाच्या देखभालीची जबाबदारी देण्याची मागणी अनेकदा पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून केली आहे. मात्र प्रशासनाने अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती स्थानिक रहिवासी राजू नलावडे यांनी दिली.

Comments are closed.