सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं मुंब्य्रातून उत्तर
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यात, येथील विजयानंतर मुंब्रा येथे एमआयएमने जिंकलेल्या 5 जागा लक्षवेधी ठरल्या. एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी केलेल्या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. तसेच, जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसा हराया.. असं वक्तव्यही तुफान व्हायरल झालं होतं. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. तसेच, एक लहान मुलगी म्हणत तिचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. मुंब्रा हा तिरंगा आहे, इथे तिरंगाच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या सोहळ्यापूर्वी मुंब्रातील रॅलीत आव्हाड यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. कोण आया, कोण आया… शेर का शिकारी आया, अशा घोषणा जितेंद्र आव्हाड आले असता देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आमदार आव्हाड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. आज काल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, हे नवीन पोरं जे असतात ते अशा कल्पक घोषणा करतात. काहींनी आव्हान दिलं, त्यासंर्भातही आव्हाड बोलले, आव्हान देणं हे लोकांचं काम असतं. आपण त्यांच्या आव्हानासाठी काही करत नाही, आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, असे म्हणत सहर शेख यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणे जितेंद्र आव्हाड यांनी टाळले. तसेच, हाथी चले अपली चाल, कुत्ते भोके हजार म्हणत एमआयएमच्या विजयावर बोलताना आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
सहर शेखच्या वक्तव्यावरही आव्हाड यांनी पलटवार केला. असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे सोशल मीडियावरती तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे, तिच्या त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत म्हटली… चॉकलेट लाया.. तर तेही गाजेल त्यात काय विशेष नाही, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. तसेच, मुंब्रा तिरंगा है, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही.
हेही वाचा
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार जिंकले; झेडपी अन् पंचायत समितीला बिनविरोध
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार जिंकले; झेडपी अन् पंचायत समितीला बिनविरोध
आणखी वाचा
Comments are closed.