मंगलप्रभात लोढांकडून दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरु करण्यासाठी पडद्यामागून हालचाली? राज ठाकरेंची
दादर काबूटर खाना: भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दादर कबूतर खाण्यासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे. सकाळपासूनच त्याबाबतच्या बातम्या समोर आल्या होत्या राज ठाकरे यांची मंत्री मंगल प्रभात लोढा हे भेट घेणार आहेत. त्यानंतर पाच ते साडेपाच दरम्यान मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दादर येथील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दादर मधील कबूतर खाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. लोढांकडून दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरु करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत का? अशा चर्चा देखील सुरू आहेत.
कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात आली आहे. तसेच दादरमधील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज (Jain Community) चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळलं होतं. कबुतरखानाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आपली रोखठोक भूमिका व्यक्त करत मंत्री मंगल फ्रभात लोढा यांना सुनावलं होतं. कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनीही काही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते. यादरम्यान, राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला होता. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय, मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी तेव्हा म्हटलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
3 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री उदय सामंत (शिवसेना नेते) यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्याने मुंबईतील 51 कबुतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर, बीएमसीने शहरातील कबुतरखान्यांविरुद्ध मोहीम सुरू केली ज्या अंतर्गत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आणि कबुतरखान्याना बंद करण्यात आले. दादर पश्चिम येथील कबूतरखाना पालिकेने ताडपत्री लावून बंद केला. या नंतर जैन धर्मीय यांच्याकडून थेट कबुतरखाना खुला करावा म्हणून आंदोलन झाले आणि त्यांनी दादर येथील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पुन्हा कोर्टात सुनावणीला गेले आणि न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 31 तारखेला होईल, असे म्हणत आंदोलनावर ताशेरे ओढले. कबूतरखाने बंदच राहतील, असे आदेश देखील न्यायालाने दिले. कोर्टाने दिलेले आदेश असताना ही, आता अनेक जणांकडून युक्त्या लावून कबुतरांना धान्य टाकण्याचे पराक्रम सुरूच आहेत. काही जण गच्चीवर कबूतरांना धान्य देत आहेत तर काही गाडीच्या छतावर. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.