कोकणात भाजपचा शिंदेंना दे धक्का; मंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात स्वबळावर लढणार
सिंधुदुर्ग : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Election) पडघम वाजू लागले असून राजकीय पक्ष युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे दोन्हीही पक्षातील प्रमुख नेत्यांनी म्हटलं आहे. तर, काही ठिकाणी स्थानिक नेते आक्रमक झाले असून स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे, पक्षप्रमुखांची कोंडी होताना दिसून येते. तर, महायुतीतही (Mahayuti) भाजपकडून धक्कातंत्र पाहायला मिळत आहे. कारण, मंत्री नितेश राणे (Nitesh rane) यांनी सिंधुदुर्गात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केलंय.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी मंत्री नितेश राणे यांनी दाखवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढती मधून आम्ही निवडणुका लढू असं म्हणत, प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याची संधी मिळत असेल. त्यामुळे, त्याचं स्वागतच करायला पाहिजे, असे नितेश राणेंनी म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची युती झाली तर उबाठा आणि महाविकास आघाडीला रेडिमेड उमेदवार मिळतील. उबाठा किंवा महाविकास आघाडीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवार नाहीत. ते आमची युती केव्हा होते आणि बंडखोरी होऊन आपल्याला उमेदवार केव्हा मिळतील हे बघत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वबळावर लढावं, अस नितेश राणेंनी म्हटलं आहे. तसेच, एक दुसऱ्यावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढवाव्यात, असे आवाहनच राणेंनी महायुतीमधील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
आम्ही मॅच्युअर्ड लोक आहोत, आम्हाला माहिती आहे, राज्याच्या हितासाठी उद्या एकत्र यायचं आहे. त्यामुळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणुका लढ्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसतं आहे, असे म्हणत राणेंनी एकप्रकारे स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, भाजपचा हा स्वबळाचा नारा म्हणजे शिंदेंना दे धक्का असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यातील आणखी कोणत्या जिल्ह्यात राबवला जाईल, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज ठाकरे मुद्देसूद बोलतात, पण…
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या 96 लाख बोगस मतदाराच्या मुद्द्यावरही राणेंनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येते त्यावर लोक विचार करतात, असा आतापर्यंत अनुभव आहे. पण, कालच्या झालेल्या सभेनंतर अशा पद्धतीचे व्होट चोरीचे आरोप हे लोकसभेनंतर का झाले नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा
आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची; मतदार याद्यांवरुन राणे-देशपांडे यांच्यात जुंपली
आणखी वाचा
Comments are closed.