Video: मी सब कॉन्सियंस माईंडने निर्णय घेतला, घायवळ बंदुक परवान्याबाबत योगेश कदमांचं स्पष्टीकरण


मुंबई : पुण्यातील निलेश घायवळ (निलेश घयावल) प्रकरणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं असून पुणे गुंडगिरीमागे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे समोर येत आहे. निलेश घायवळ याच्या भावाला बंदुक परवाना देताना थेट गृहराज्यमंत्र्यांकडूनच आदेश आल्याने पोलिसांनी हा परवाना दिल्याचं सांगितलं जात आहे. आता, याप्रकरणी, योगेश कदम यांनी परवान्याबाबत स्पष्टीकरण दिलं असून शिवसेना नेते रामदास कदम यांनीही भूमिका मांडली आहे. तसेच, विधिमंडळातील एका नेत्याच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी विधिमंडळ सभापती राम शिंदे यांचे नाव घेतल होते.

घायवळ परवानाप्रकरणी योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांना कदाचित माहिती नसेल परवाना देताना ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते मुद्दा केलं जातं. याबाबत सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेईल. मी सामाजिक मीडियातून स्पष्टीकरण दिलंय. मी या खुर्चीवर बसल्यापासून प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला परवाना देण्याबाबत माझ्याकडून शिफारस झालेली नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आजपर्यंत आमच्याकडून कधी झालेलं नाही, यापुढेही कधी होणार नाही, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी म्हटलं. म्हणून, जे काही गुन्हे दाखल होते, तरीही लायसन्स कसे दिले ह्या सर्व आरोपांची माहिती मी लवकरच देईन.

मी सब कान्सियस माईंडने हा निर्णय घेतला

जेव्हा अपील केली जाते, ती वैयक्तिक अपील असते. त्यामुळे, शेवटी त्या वक्तीचं कॅरेक्टर कसं आहे हे पाहिलं जातं. सचिन घायवळवरती 15-20 वर्षांपूर्वी जे गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्यातून 2019 मध्ये न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामध्ये, सेटलमेंटसुद्धा नाही, हे सगळे लक्षात घेऊनच मी सब कॉन्सियस माईंडने हा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरणही योगेश कदम यांनी दिले आहे.

रामदास कदमांचे रॅम शिंदेंकडे बोट

उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परबांनी अकलेचे दिवे पाजळले आहेत, योगेश कदम याला नेहमी टार्गेट केले. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. उद्धव ठाकरे यांना भेटून योगेश कदम यांनी मला त्रास दिला जात असल्याचे म्हटले होते. योगेश कदम मंत्री झाल्याने यांना पोटशूळ उठले, असे म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडिल आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुण्यातील घायवळ प्रकरणावर भाष्य केले. कुठलीही केस घायवळवर नव्हती, तो शिक्षक, बिल्डर असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. पण, तो काय तुला विचारून निर्णय घेणार का, असा सवालही रामदास कदम यांनी अनिल परबांना विचारला. विधिमंडळात असलेल्या मंत्र्यांना ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचे नाव मुख्यमंत्री यांना पाठवले आहे, त्यांनी शिफारस केल्यानंतर निर्णय घेतल्याचे सांगत रामदास कदम यांनी विधानसभा सभापती राम शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.

https://www.youtube.com/watch?v=91rv4pfe8ys

दरम्यान, अनिल परबांनी आरोप केले की वाळू काढली, पण एक गोंधळ वाळू काढली नाही. 35 वर्षे झालं हा बार आहे, तो डान्सबार नव्हता. आम्ही पैशांसाठी खालच्या लेवलवर जाणार नाही. हॅाटेल ड्रमबीड बार कुणाचा आहे, ठाकरे कुटुंबाचा आहे. आता तो का बंद आहे, कारण लायसन्स रद्द झाले, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

हेही वाचा

महसूलमंत्र्यांची धाड, कार्यालयात सापडले 5 हजार; अखेर सह दुय्यम निबंधकाचे निलंबन, आदेश जारी

आणखी वाचा

Comments are closed.