मीराबाई चानूने Asian Games मध्ये जिंकले रौप्य, भारताची वेटलिफ्टिंगमधील 28 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात!

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूची आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. तिने बुधवारी (23 सप्टेंबर) ऐची आणि नागोया येथे सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

मीराबाईने या स्पर्धेत एकूण 198 किलो वजन उचलले, ज्यामध्ये ‘स्नॅच’ प्रकारात 87 किलो आणि ‘क्लीन अँड जर्क’ (C&J) प्रकारात 111 किलो वजनाचा समावेश होता. यामुळे तिने रौप्य पदक पटकावले.

या प्रकारात सुवर्ण पदक उत्तर कोरियाच्या री सॉन्ग गम हिने जिंकले. तिने 215 किलो वजन उचलले, तर इंडोनेशियाच्या विजयाना लुलुक डायना त्रि हिने कांस्य पदक पटकावले.

मीराबाईचे हे पदक खास आहे, कारण या पदकाने भारताची 28 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 1998 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिले पदक आले आहे.

त्याचबरोबर मीराबाईच्या लक्षवेधी कारकिर्दीमध्ये आणखी एका पदकाची भर झाली आहे.

Comments are closed.