हार्दिकच्या पुनरागमनामुळे MI चा अनोखा रेकॉर्ड; पुणे वॉरियर्सनंतर 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच टीम!
आयपीएल 2026 च्या 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि 5 वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस (नाणेफेक) जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेऑफच्या शर्यतीच्या दृष्टीने 3 वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, सध्या सर्वात जास्त चर्चा मुंबई इंडियन्सच्या संघात त्यांच्या नियमित
मुंबई इंडियन्सला या सामन्यापूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने टॉसनंतर सांगितले की, संघात दोन बदल करण्यात आले आहेत. त्याच्यासोबत अफगाणिस्तानचा तरुण फिरकीपटू अल्लाह गझनफर आजचा सामना खेळत आहे. या पुनरागमनासोबतच मुंबई इंडियन्सच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.
हार्दिक पांड्या टॉससाठी मैदानात उतरताच, मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील दुसरी अशी टीम बनली आहे, जिचे सलग तीन सामन्यांत तीन वेगवेगळ्या खेळाडूंनी कर्णधारपद सांभाळले आहे. या सामन्यापूर्वी आधी सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह यांनी मुंबईचे कर्णधारपद सांभाळले होते; आणि आता हार्दिक पांड्या नेतृत्व करत आहे.
आयपीएलच्या (IPL 2026) इतिहासात यापूर्वी असा प्रकार फक्त एकदाच घडला होता. 2013 मध्ये ‘पुणे वॉरियर्स इंडिया’ (PWI) या संघाने सलग तीन सामन्यांत तीन वेगवेगळ्या कर्णधारांसह खेळ केला होता. त्या वेळी सलग 3 सामन्यांत रॉस टेलर, अँजेलो मॅथ्यूज आणि ॲरॉन फिंच यांनी पुणे संघाचे कर्णधारपद भूषवले होते.
Comments are closed.