IPL 2026: आयपीएल 2026 मधूनच एम एस धोनीने सोडली चेन्नईची साथ! गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वीच रांचीला परतला
आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल 2026 च्या शेवटच्या लीग सामन्यात ‘माही’ मैदानात उतरेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र, आता फ्रँचायझी आणि चाहते दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. 5 वेळचा आयपीएल विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या हंगामाच्या मध्यंतरातच चेन्नई सुपर किंग्सची (CSK) साथ सोडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने आयपीएल 2026 च्या मध्यभागीच संघ सोडला आहे. माही पुढील सामन्यासाठी अहमदाबादला जाण्याऐवजी थेट आपल्या रांची या गावी निघून गेला आहे. या बातमीमुळे चाहत्यांचे हृदय तुटले आहे.
चेन्नईचा संघ अजूनही प्लेऑफमध्ये (Playoffs) पोहोचू शकतो. मात्र, त्यासाठी त्यांना कोलकाता, पंजाब, दिल्ली आणि राजस्थान या संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. यासोबतच चेन्नईला स्वतःचा सामना गुजरातविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. रिपोर्ट्सनुसार, जर एखादा चमत्कार झाला आणि चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, तर धोनी पुन्हा एकदा संघासोबत जोडू शकतो. पण त्यासाठी आधी चेन्नईला नशिबाची मोठी साथ लागेल.
सततच्या खराब फॉर्मशी झगडत असलेला कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्यावर सध्या प्रचंड दडपण दिसत आहे. आयपीएल 2026 च्या या शेवटच्या सामन्यात तो आपल्या बॅटने धमाकेदार खेळी करून संघाच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईसाठी सातत्याने धावा करणाऱ्या संजू सॅमसनवरही (Sanju Samson) संघ व्यवस्थापनाचे बारीक लक्ष आहे. चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता यावी, यासाठी सॅमसनलाही या शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करावी लागणार आहे.
Comments are closed.