मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे बांग्लादेश 64 धावांवर गारद; 2026 मधील सर्वात लाजिरवाणा विक्रम नावावर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 64 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक एकूण सहा बळी टिपले. दरम्यान त्याने एक नवीन विक्रमही प्रस्थापित केला. कसोटी डावात 100 किंवा त्यापेक्षा कमी धावांत सर्वबाद होणारा बांगलादेश हा 2026 मधील पहिला संघ ठरला आहे. बांगलादेशच्या तब्बल सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टार्कने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शादमान इस्लामला बाद केले. त्यानंतर बांगलादेशी फलंदाजांची जणू रांगच लागली आणि अवघ्या 12 धावांत संघातील निम्मे खेळाडू तंबूत परतले होते.
कसोटी डावात 2026 मधील सर्वात कमी धावसंख्येचा नकोसा विक्रम आता बांगलादेशच्या नावावर जमा झाला आहे. या वर्षी 100 धावांच्या आत सर्वबाद होणारा तो पहिला संघ आहे. यापूर्वी श्रीलंकेचा संघ या यादीत अव्वल स्थानावर होता. जून महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेचा संघ 101 धावांत सर्वबाद झाला होता.
सामन्यात एका टप्प्यावर बांगलादेशची स्थिती अत्यंत बिकट होती. अवघ्या 12 धावांत पाच फलंदाज बाद झाले होते. पहिल्या सहापैकी चार फलंदाजांना तर खातेही उघडता आले नाही. याचे संपूर्ण श्रेय मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीला जाते.
मिचेल स्टार्कने या डावात एकूण सहा विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आता 441 विकेट्स आहेत. या सामन्यादरम्यान, त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा 439 कसोटी विकेट्सचा विक्रम मागे टाकला.
याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्कने भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही मागे टाकले आहे. अश्विनच्या नावावर 765 विकेट्स होत्या, स्टार्कने आता 767 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा गाठला आहे.
Comments are closed.