मोठी बातमी! बुमराहचे वर्चस्व संपुष्टात, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने कसोटी क्रमवारीत काबीज केले अव्वल स्थान

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश मॅके कसोटी सामन्यानंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. या सामन्यात प्रभावी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करताना त्याने जसप्रीत बुमराह याला मागे टाकले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज फेब्रुवारी 2024 मध्ये पहिल्यांदा अव्वल स्थानी आला आणि त्याने सुमारे दोन वर्ष हे स्थान कायम राखले. आता त्याच्या या स्थानाला स्टार्कने धक्का दिला आहे.
श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील बुमराहची अनुपस्थिती आणि बांगलादेशविरुद्ध स्टार्कची चमकदार कामगिरी यांमुळे आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे.
स्टार्कने मॅके कसोटीत 10 विकेट्स घेतल्या होत्या. 36 वर्षीय डावखुऱ्या गोलंदाजाने 12 धावांत सहा आणि 39 धावांत चार विकेट्स घेत डावाच्या आणि 51 धावांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
या कामगिरीमुळे त्याने मॅट हेन्री आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकले असून, तो त्यांच्यापेक्षा 10 रेटिंग गुणांनी आघाडीवर आहे. गेल्या वर्षी बॉक्सिंग डे कसोटीनंतर दुसरे स्थान पटकावणाऱ्या स्टार्कला मॅके कसोटीनंतर सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. तो कारकीर्दीत पहिल्यांदाच कसोटी गोलंदाजी क्रमवारीच्या पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. (Mitchell Starc Diaplaces Jasprit Bumrah to take NO. 1 position in ICC MEN’S TEST Bowling Rankings)
Comments are closed.