मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही..; आमदार अभिमन्यू पवारांचा टोमणा, मेधा कुलकर्णी निघून गेल्या
पुणे : भाजप खासदार आणि आमदार यांच्यातील राजकीय नाराजीनाट्य पुण्यातील (Pune) कार्यक्रमातून दिसून आले. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युपीएससी, एमपीएससी उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळालं. मात्र, आमदार अभिमन्यू पवार यांनी खासदार मेधा कुलकर्णी (मेधा कुलकर्णी) यांना टोमणा मारल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. तर, मी जातीचा विषय किंवा वाद काढलाच नाही, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटलं.
खासदार मेधा कुलकर्णी यांना कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवार यांनी टोमणा मारला. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही म्हणताच मेधा कुलकर्णींनी रागात कार्यक्रम सोडला, त्या भर कार्यक्रमातून निघून गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे, राजकीय वर्तुळात आणि कार्यक्रमस्थळी या घटनेची चांगलीच चर्चा रंगली.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ताईंचा गैरसमज झाला आहे, मी त्यांना एवढेच म्हटलं की नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण, ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू मी त्यांना एवढेच बोललो आहे, यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही, असे स्पष्टीकरण अभिमन्यू पवार यांनी दिले.
मी दिलगिरी व्यक्त करतो – पवार
मी ताईला देखील विनंती करतो की, मी काय बोललो ते तुम्ही आठवून बघा. हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही, त्या माझ्या नेत्या आहेत, वरिष्ठ आहेत. त्यानंतर देखील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमातून निघून जावं की बसावं हा त्यांचा विषय आहे. मात्र, पुढे एकच खुर्ची रिकामी होती म्हणून त्यांना विनंती केली, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.