वाल्मीक कराड नसल्याची खंत वाटत असेल तर त्याच्यासोबत जाऊन बसा, प्रकाश सोळंकेंचा मुंडेंना टोला
धनंजय मुंडे: धननंजय मुंडे (धनंजय मुंडे) यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी मुंडेंना जोरदार टोला लगावला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या वाल्मीक कराडबाबतच हे वक्तव्य केलं असावं, तो नसण्याची एवढी खंत वाटत आहे तर त्याच्यासोबत जाऊन बसा आणि खंत दूर करा असा टोला आमदार प्रकाश सोळुंके यांनी धनंजय मुंडेंना लगावला.
वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात
वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे. त्याबाबतच्या या वक्तव्यावरून आता बीडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. वाल्मीक कराडबद्दल फारच खंत वाटत असेलत तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा असा टोला सोळंके यांनी लगावला.
अंबादास दानवेंचीही धनंजय मुडेंवर टीका
काल धनंजय मुंडे याने आपल्या व्यक्तव्यातून सिद्ध केलं की ते वाल्मिकच्या पाठीशी आहेत अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. मतदार याद्या करताना मोठ्या प्रमाणात घोळ. झाला आहे. कित्येक ठिकाणी तक्रारी आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. राजकीय पक्षांनी असे आक्षेप घेतल्यावर त्याची शहानिशा झाली पाहिजे असेही दानवे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
बीडमध्ये परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून आज प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हे दोन्ही नेते या प्रचारसभेत उपस्थित होते. या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी आपलं भाषण संपवताना त्यांचे जुने जवळचे सहकारी वाल्मिक कराडची नाव न घेता आठवण काढल्याची चर्चा आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे.
शिंदे गटाला धमकावून गिरीश महाजन यांनी आपल्या पत्नीला नगरध्यक्ष केलं, अंबादास दानवेंची टीका
अजित दादा एका नगरपालिकेचे नेते आहेत की राज्याचे नेते आहेत. राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला. दरम्यान, सर्व संस्थाची नावे मुंबई झाली पाहिजे. आय आयटी मुंबई असे म्हणायला काही हरकत नाही असे दानवे म्हणाले.
फोडाफोडीची मी शेकडो उदाहरण आपल्याला देतो. त्या दिवशी शिंदे गटाला धमकावून गिरीश महाजन यांनी आपल्या पत्नीला नगरध्यक्ष केल्याची टीका दानवे यांनी केली. मराठी लोकांनी मत करायला हवं. जो मराठी माणसाच्या पाठीशी राहतो त्याला मत दिलं पाहिजे.
महत्वाच्या बातम्या:
Parli Election : परळीवर माझं पूर्ण लक्ष, पवारांच्या राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार; खासदार बजरंग सोनवणेंचा विश्वास
आणखी वाचा
Comments are closed.