जैन मुनींकडून जनकल्याण पार्टीची घोषणा, पक्षचिन्ह कबुतर; मनसेची पहिली प्रतिक्रिया, मनीषा कायंदेह


कबुत्ररखाना जैन समुदाय धर्म सभा: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज (11 ऑक्टोबर) जैन धर्मियांकडून (Jain Community) मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व जैनमुनींनी एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. आता आमची देखील संघटना असणार आहे. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू…कबुतरांची पार्टी पाहिजे, शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत निलेश मुनींकडून जन कल्याण पार्टीची (Jan Kalyan Party) घोषणा करण्यात आली. तर धर्मसभेत मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं?, दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य जैनमूनी कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj) यांनी केले. जैन धर्मीय लोक सर्वात जास्त टॅक्स भरतात, असे देखील जैनमुनींनी म्हटले. आता यावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) आणि शिवसेना आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले की, याचा अर्थ तुम्ही मुंबईवर हक्क सांगणार की काय? टॅक्स भरताय म्हणजे काय? संपूर्ण देशात महाराष्ट्रातील जमीन सुपीक आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा मान मोडेपर्यंत इमानाने काम करतो. तो कुणालाही फसवून बँकेला बुडवून परदेशात जात नाही. तो ज्याच्याकडे काम करतो त्याच्याकडे अत्यंत इमानाने काम करतो. हे मराठी माणसाचे योगदान आहे. मराठी माणसाने अत्यंत सहिष्णूपणे इतर प्रांतीयांना इकडे जागा दिली आणि तेच आता मुंबईवर हक्क सांगण्याचा डाव करत आहेत, असे त्यांनी म्हटले.

Avinash Abhyankar on Jain Muni: डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मूर्ख आहेत का?

एक-दोन जण मेल्यानं काय होतं? असे वक्तव्य जैनमुनींनी केले. याबाबत विचारले असता अविनाश अभ्यंकर म्हणाले की, ते जर स्वतःला अहिंसवादी समजतात. त्यांना एखाद-दुसरा माणूस मरून फरक पडत नसेल तर यावर मला उत्तर द्यावेसे सुद्धा वाटत नाही. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. माझं या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगणं आहे की, तुम्ही इतरांना ज्ञान देत आहात ना. मग तुमच्या मंदिराला लावलेल्या जाळ्या काढून टाका. कशाला चॅलेंज करत आहात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मूर्ख आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Manisha Kayande on jain Muni: मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया

जैनमुनींच्या वक्तव्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. मनुष्याच्या जीविताशी हा संबंधित विषय आहे. त्या विषयाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांच्या घरातलं कुणी फुफ्फुसाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडलं असेल आणि ते कबुतरांमुळे झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांनी असे वक्तव्य केले असते का? आज मराठवाड्यात अनेक जनावरे मृत्युमुखी पावली त्यांच्याबद्दल काय? आज रेबीजमुळे माणसे मरत आहेत. त्यांना अनेक रोग होत आहेत. कुठल्याही जैनांच्या घरी कबुतराचा फोटो आहे का? तुम्ही त्याची पूजा करता का? तो एक पक्षी आहे. घरात उंदीर आले तर आपण गणपतीचे वाहन म्हणून त्याला नमस्कार करायचं का? असे अनेक प्राणी आहेत जे मनुष्याला हानी पोहोचवतात, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

https://www.youtube.com/watch?v=kjrkpvtfoic

आणखी वाचा

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचा नवा पक्ष, कबुतर आमचं पक्षचिन्ह, चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री, जैन मुनींची घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.