मीरा-भाईंदरमध्ये मराठी आंदोलकांना अटक; प्रताप सरनाईकांनी सरकारला सुनावले, म्हणाले, देवेंद्र फडण

MNS Mira Bhayandar Morcha: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची (MNS Mira Bhayandar Morcha) हाक दिलीय. आज सकाळी बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मात्र पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. सध्या मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. यावरुन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले.

पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची- प्रताप सरनाईक

पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे आहे. मीरारोडमधअये जे सुरुय ते अत्यंत चुकीचं आहे, असं थेट प्रताप सरनाईकांनी सांगितले.

मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात-

आज मीरा रोडमध्ये होत असलेल्या मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर   वसई विरारमधील बऱ्याच मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजता घरातून, उचलून  विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आलं आहे. नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, नायगांव पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील. माजी नगरसेवक आणि शहर सचीव प्रफुल्ल पाटील, वसई शहर संघटक राकेश वैती, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, विरार शहराध्यक्ष विनोद मोरे, नालासोपारा उपशहरअध्यक्ष संजय मेहरा , नालासोपारा विभागध्यक्ष दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर, वाहतूक सेना अध्यक्ष पांडुरंग लोखंडे यांच्यासह अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=xj8h8i-g2hq

संबंधित बातमी:

MNS Mira Bhayandar Morcha: मोर्चाला परवानगी नाकारलेय, कलम 144 लागू, एकत्र जमू नका; मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची फायनल वॉर्निंग

आणखी वाचा

Comments are closed.