मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढ


MNS MVA मुंबई मोर्चा: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एकत्र येत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याची घोषणा केली असली, तरी या मोर्चाला मुंबई पोलिसांनी आतापर्यंत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आज 1 नोव्हेंबर रोजी होणारा हा मोर्चा विनापरवाना निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), तसेच काँग्रेस व डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.

MNS MVA Mumbai Morcha: सत्याच्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळेना

या मोर्चाचा प्रारंभ दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून होणार असून, तो मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. मोर्चा दुपारी 1 ते 4 या वेळेत काढण्याची योजना आहे, जेणेकरून मुंबईकरांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा येऊ नये. मात्र, मुंबई महापालिकेचा परिसर आणि आझाद मैदानाबाहेरून कोणताही मोर्चा काढण्यास परवानगी देता येणार नाही. नियमांनुसार, फक्त आझाद मैदानाच्या आत मोर्चा काढण्याचीच मुभा आहे. त्यामुळे फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

MNS MVA Mumbai Morcha: पोलीस कायदेशीर कारवाई करणार

दरम्यान, विनापरवानगी मोर्चा झाल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच्या मोर्चानंतर आयोजकांवर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मोर्चाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून विरोधक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय? (What are the demands?)

1. मतदारयाद्या अद्ययावत करा

2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा

3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा

4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

मोर्चात कोण कोण उपस्थित राहणार? (Who will be present at the morcha?)

शरद पवार, राष्ट्रवादी (शपथ)
उद्धव ठाकरे, शिवसेना(उबाठा)
राज ठाकरे, मनसे
विजय वडेट्टीवार,काँग्रेस
बाळासाहेब थोरात,काँग्रेस
सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी(शप)
जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी(शप)
जयंत पाटील,राष्ट्रवादी(शप)
रोहित पवार, राष्ट्रवादी (शपथ)
शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी(शप)
आदित्य ठाकरे,शिवसेना(उबाठा)
बाळा नांदगावकर, मनसे
जयंत पाटील, शेकाप
प्रकाश रेड्डी, भाकप
अनिल परब,शिवसेना(उबाठा)
अनिल देसाई, शिवसेना (उभाठा)
अरविंद सावंत, शिवसेना(उबाठा)
राजन विचारे , शिवसेना(उबाठा)
सचिन अहिर , शिवसेना(उबाठा)
अंबादास दानवे, शिवसेना(उबाठा)
सुनील प्रभू, शिवसेना(उबाठा)
सुनील शिंदे, शिवसेना(उबाठा)
अविनाश अभ्यंकर, मनसे
नितीन सरदेसाई, मनसे
संदीप देशपांडे, मनसे
अविनाश जाधव, मनसे
नसीम खान, काँग्रेस
सचिन सावंत, काँग्रेस
अमीन पटेल, काँग्रेस

आणखी वाचा

MNS Morcha : निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार? मतदानावर बहिष्कारासह तीन-चार पर्यायांवर चर्चा, दोन दिवसात निर्णय होणार

आणखी वाचा

Comments are closed.