मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्
नाशिक: राज्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेची (Shivsena And MNS) आज अधिकृतरित्या युतीची घोषणा होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर सात महापालिकामध्ये ठाकरे बंधूंची युती पाहायला मिळेल. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटप ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने (Shivsena And MNS) पूर्ण केल्यानंतर आज युतीची अधिकृत घोषणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे, आणि शिवसेना ठाकरे गटाचा नेमका जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार? कोण किती जागा लढवणार? मित्र पक्षांना किती जागा देणार…? असे अनेक उपस्थित झालेले प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. अशातच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेचं मोठा भाऊ असणार आहे.(Shivsena And MNS)
Shivsena UBT: नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा करणार आहेत. या घोषणेआधीच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या युती संदर्भात बैठका पार पडल्या असून कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. नाशिक महापालिकाच्या 122 जागापैकी 72 ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर 50 जागा मनसेकडे राहण्याची शक्यता आहे, यात माकप, वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी बोलणी सुरू आहे, त्यामुळे या जागा वाटपात मित्र पक्षांना सामावून घेतल्यानंतर त्यांना किती जागा दिल्या जातात त्यानुसार फॉर्म्युलात बदल होणार आहे. तर काँग्रेस आणि मनसे या दोघांमध्ये वाकयुद्ध रंगल्यानं काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. 2017 नाशिक महापालिकाची निवडणूक झाली होती, त्यावेळी 122 पैकी 5 जागांवर मनसेचे नगरसेवक जिंकून आले होते. तर 35 जागांवर शिवसेना निवडून आली होती, मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे, शिवसेना दुभंगली गेली असून सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 8 तर मनसेकडे 3 नगरसेवक आहेत, त्यामुळे मनपा निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान ठाकरे ब्रँडवर असणार आहे.
Shivsena UBT -MNS: युतीच्या घोषणेवळी जागावाटपाचा फॉर्म्युला, उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
मुंबईसह सात नगरपालिकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष एकत्रित लढणार आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुंबईची लढाई ही त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी दुपारी 12 वाजता एकत्र येऊन युतीची घोषणा करतील. तत्पूर्वी हे दोघे भाऊ दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज युतीच्या घोषणेवळी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Comments are closed.