भुवीच्या कमबॅकवर शमी स्पष्टच बोलला! म्हणाला, “मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही तर…”

मागील काही दिवसांपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांची स्थिती सारखीच होता. दोघेही अनेक दिवसांपासून राष्ट्रीय संघाबाहेर होते. यामुळे त्यांनी निराश न होता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली, मात्र जेव्हा न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला, तेव्हा सर्व चित्र पालटले. भुवनेश्वर चार वर्षांनंतर भारतीय संघात परतला. त्याच्या या पुनरागमनावर शमीची प्रतिक्रिया आली आहे.

भुवनेश्वरचे संघपुनरागमन झाले, तर शमीची भारतीय संघाची प्रतीक्षा कायम आहे. शमीने २०२३ चा विश्वचषक आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र त्यानंतर त्याला दुखापतीमुळे संघातील स्थान गमवावे लागले. त्याने भारतासाठी शेवटचा सामना मार्च २०२५ मध्ये खेळला होता. तो दुखापतीतून सावरला आणि त्यानंतर त्याने देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली, तरीही त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. आता तो रणजी ट्रॉफीध्ये खेळताना दिसणार आहे.

११ ऑक्टोबरपासून नवा रणजी ट्रॉफीचा हंगाम सुरू होत आहे. यामध्ये शमी बंगाल क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतो. भुवनेश्वरची निवड झाल्यानंतर शमीला त्याच्या निवडीबद्दल विचारले असता तो म्हणाला “भुवनेश्वर कुमारला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली आणि ही त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या निवडीशी माझा काहीही संबंध नाही. मला जिथे कुठे खेळण्याची संधी मिळेल, तिथे मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन. सध्या माझे पूर्ण लक्ष या रणजी सामन्यावर केंद्रित आहे.

जर मला पुन्हा भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, तर त्यात माझे काहीही नुकसान नाही,” असेही शमी पुढे म्हणाला आहे.

Comments are closed.